Mobile apps games full versions,Download top apk games, computer hacking tools software,Become an Ethical Hacker
"मी बलात्कार केला नाही, पण जगाला आता माझी ओळख बलात्कारी म्हणूनच झाली आहे. पोलिसांच्या चुकीच्या आणि घाईच्या तपासामुळे माझं अवघं आयुष्य उद्धवस्त झालं. काहीही न करता मला तब्बल सात वर्ष जेलमध्ये रहावं लागलं. पण हायकोर्टाने माझी निर्दोष मुक्तता केली. मात्र माझ्या आयुष्यातील ती सात वर्ष कोण परत देणार? माझी पूर्वीची ओळख कशी तयार होणार? अशी हतबलता घेऊन, गोपाळ शेट्ये आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून, न्याय मागायचा आहे.
न केलेल्या गुन्ह्यात गोपाळ शेट्ये यांनी आपल्या आयुष्यातील तब्बल सात वर्ष काळ्या कोठडीत घालवली आहेत. टाहो फोडून त्यांनी निर्दोषता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र डोळ्यावर काळी पट्टी बांधलेल्या न्यायदेवतेला त्यांची निर्दोषता ना दिसली, ना गुन्ह्याचा शोध तत्परतेने लावल्याचा टेंभा मिरवणाऱ्या पोलिसांना त्यांची केविलवाणी मागणी ऐकता आली.
बलात्काराच्या खोट्या आरोपात अटक
29 जुलै 2009 हा दिवस गोपाळ शेट्ये यांच्या आयुष्यातील काळाकुट्ट दिवस. याच दिवशी रेल्वे पोलिसांनी गोपाळ यांना घाटकोपरच्या एका हॉटेलमधून उचललं. साध्या वेशात आलेल्या पोलिसांनी काहीही कारण न देता, गोपाळ यांना पकडून थेट कोठडीत टाकलं. त्यांना तीन दिवस कुर्ल्याच्या जीआरपी कोठडीत ठेवलं. मात्र या तीन दिवसात गोपाळ यांनी सातत्याने आपल्या कोठडीचं कारण विचारलं. मात्र गुन्ह्याचा तपास लागल्याच्या अविर्भावात असलेले पोलिस, गोपाळ यांची कैफियत ऐकायच्या मनस्थितीत नव्हते.
काही वेळानंतर गोपाळ यांना धक्काच बसला. कारण त्यांना एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
बलात्कार करणारा गोपी, पकडला गोपाळला
19 जुलै 2009 रोजी घाटकोपर स्टेशनजवळच्या रेल्वे ब्रीजवर झोपलेल्या औरंगाबादच्या महिलेवर बलात्कार झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून, दहा दिवसांनी गोपाळ शेट्ये यांना ताब्यात घेतलं होतं. मात्र गोपाळ यांनी पहिल्यापासून आपलं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी धडपड चालवली होती.
मात्र गोपाळ त्यावेळी हतबल झाले, ज्यावेळी पीडित महिलेने बलात्काऱ्याचं नाव गोपी असल्याचं सांगितलं होतं. पण पोलिसांनी नाव साधर्म्यामुळे गोपीऐवजी गोपाळ यांना अटक केली होती.
सत्र न्यायालयाकडून सात वर्षांचा कारावास
या धरपकडीनंतर पोलिसांनी दहा महिन्यांमध्ये शिवडी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं. त्यावरून कोर्टाने गोपाळ यांना दोषी धरलं आणि एखाद्या बलात्काऱ्याला जी शिक्षा असेल, त्याप्रमाणे शिक्षा सुनावली. ती शिक्षा होती तब्बल 7 वर्षे. कोर्टाचा निकाल ऐकून आधीच हादरलेले गोपाळ आणखी बधीर आणि सुन्न झाले. जो गुन्हा केलाच नाही, त्याबद्दल शिक्षा झाली होती.
खरोखर गुन्हा करणारे अट्टल गुन्हेगारही कोर्टाच्या शिक्षेनंतर ढसाढसा रडायला लागतात. मात्र न केलेल्या गुन्ह्यातही तब्बत सात वर्षांची शिक्षा झाली असेल, तर गोपाळ यांची अवस्था काय झाली असेल, याची कल्पनाच केलेली बरी.
नाशिक जेलमध्ये रवानगी
खोट्या आरोपाच्या दुष्टचक्रात सापडलेले गोपाळ शेट्ये यांचा दुर्दैवी प्रवास कुर्ला पोलिस कोठडीतून नाशिक जेलकडे सुरु झाला. गोपाळ यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. दरम्यानच्या काळातच गोपाळ यांचा म्हातारा बाप जग सोडून गेला. म्हातारपणाच्या काळात बापाचं बळ बनायचं होतं, त्याचवेळी नशिबाच्या दुष्टचक्रामुळे बाप-लेकाची ताटातूट झाली. म्हाताऱ्या बापाचं आजारपण बळावलं. त्यातच पोरावर बलात्काराचा आरोप. यामुळे दु:खाचा डोंगर कोसळलेल्या बापाने जीव सोडला. ही बातमी बापापासून लांब असलेल्या गोपाळला जेलमध्ये समजली.
बाप गेला, पत्नीचं दुसरं लग्न, मुली अनाथालयात
बाप गेला, मग म्हातारी आई मुंबईसारख्या शहरात करणार तरी काय? सोडून गेलेला नवरा आणि जेलमध्ये असलेल्या मुलामुळे भेदरलेली म्हातारी आई गावाकडे निघून गेली. गोपाळच्या मागचं हे चक्रव्यूह इथंच थांबलं नव्हतं. दोन पोरींचा बाप असलेल्या गोपाळच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. कर्ता पुरूष कारागृहात असल्यामुळे कुटुंबाला पोटाची खळगी भरणं कठीण झालं. मग गोपाळच्या पत्नीने दुसरं लग्न केलं. आता प्रश्न होता दोन मुलींचा. आई-बाप जिवंत असतानाच दोन्ही मुलींना अनाथआश्रमाचा सहारा घ्यावा लागला.
सात वर्षे शिक्षा भोगली
दुर्दैवाचं दुष्टचक्र पूर्ण करून गोपाळ शेट्ये मार्च 2015 मध्ये जेलमधून बाहेर आले. ज्यावेळी गोपाळ यांना दोषी धरलं होतं, त्याचवेळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. अखेर शेट्ये यांच्या आयुष्यात तो दिवस आला, ज्या दिवशी त्यांच्यावरील सर्व डाग हायकोर्टाने पुसून टाकले. 10 जून 2015 रोजी हायकोर्टाने गोपाळ यांना सर्व आरोपांतून दोषमुक्त केलं.
पोलिसांनी चुकीचा तपास केला : शेट्ये
कुर्ला रेल्वे पोलिसांच्या तपासात त्रुटी आढल्यामुळेच हायकोर्टाने दोषमुक्त केलं, असं गोपाळ शेट्ये सांगतात. मात्र या तपासामुळे एक-दोन दिवस नव्हे, एक-दोन महिने नव्हे, एक-दोन वर्ष नव्हे तर तब्बल 7 वर्षे आपल्याला जेलमध्ये रहावं लागल्याची हतबलता, गोपाळ यांनी व्यक्त केली.
'माझी सात वर्षे परत द्या'
आयुष्यातील जवळपास एक दशक नष्ट झालेले गोपाळ शेट्ये आता एकच मागणी करत आहेत, ती म्हणजे माझी सात वर्षे परत द्या. मुलाच्या काळजीने बाप गेला, आई गावाकडे कशीबशी आला दिवस ढकलत आहे. जिच्यासोबत उभ्या आयुष्याचं स्वप्न पाहिलं, संसाराची बाग फुलवली ती बायको खोट्या आरोपांमुळे सोडून गेली. संसाराच्या बागेत फुललेली इवलीशी दोन फुलं अनाथाश्रमात पडून आहेत. हे सर्व पोलिसांच्या चुकीमुळं झालं. माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या पोलिसांना शिक्षा झालीच पाहिजे, पण माझं बेचिराख झालेल्या आयुष्याची घडी कशी बसवणार? जगासाठी माझी ओळख बलात्कारीच आहे, ती कशी पुसणार? असे एक ना अनेक डोंगराएवढे प्रश्न गोपाळ शेट्ये विचारत आहेत.
या प्रश्नांची उत्तरं ना डोळ्याला पट्टी बांधलेली न्यायदेवता देऊ शकेल, ना तपास करणारे पोलीस, ना अन्य कोणी.
गोपाळ यांना फक्त एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यायचीय. आयुष्याची कैफियत मांडायची आहे. पण यानंतरही आयुष्य उद्ध्वस्त न करता, पुन्हा जोमाने उभं राहायचं आहे. अनाथाश्रमातील मुलींना परत आणून त्यांना समाजात मानाचं स्थान मिळवून द्यायचं आहे. आता फक्त मुलींच्या सन्मानासाठीच जगायचं आहे, असा निर्धार गोपाळ शेट्ये यांनी बांधला आहे.

0 comments: