आज एक बातमी ऐकून मला फारच गंमत वाटली ती म्हणजे मोगरा उत्सव साजरा केला दगडूशेठ गणपती मंदिरात. तब्बल ५० लाख मोग-याचा सजावटीसाठी वापर करून हा उत्सव साजरा केला. कुणाच्या श्रद्धेला आपण नाकारत नाही पण आपण काय करतोय याचे भान ह्या देवस्थान मंडळांना कधी येणार. करोडो रुपयांचे उत्पन्न कुठे? कसे? का ? जाते साधा विचार आपल्यासारखी मंडळी करत नाही. राज्यात दुष्काळ, राजकीय अराजक, गारपीट, महंगाई या सारखे अडचणीचे डोंगर उभे असताना ह्या मंडळांना हे सुचते कसे?
उत्सवात जर लग्न मोडायला निघालेली ५० जोडपी आणून एकत्र राहण्याची आणि झाले ते सोडून नवीन सुरुवात करण्याची संधी देत, नवर्याने बायकोला गजरा बांधण्याचा जरी कार्यक्रम गणपतीच्या साक्षीने केला असता तर मोडणारे संसार तर टिकले असते. दगडू शेठ गणपतीच्या आजू बाजूला ५०० मीटर परिसरातच त्यांना हि ५० कुटुंबे मिळाली असती पण हल्ली सामाजिकतेचे भान देवळांना कुठे राहिले. प्रबोधनकार खर बोलले होते हि धर्माची देवळे आणि देवळांचा धर्म माणसांसाठी नसतोच मुळी, गाडगे बाबांसारखा न शिकलेला माणूस सांगतो देवळात पुजार्याचे पोट असते आणि देव माणसांच्या मनात राहतो. आता तुम्हीच सांगा आपण काय बोलायचे ?

0 comments: